आधार कार्ड हरवल्यास एवढ्या पैशात असे मिळवा परत

यूआयडीएआयने आधार अ‍ॅपचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या अ‍ॅपचे नाव mAadhaar आहे. हे अ‍ॅप अँड्राईड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही आधार कार्डचे रिप्रिंट करण्यासाठी रिक्वेस्ट करू शकता. आधार रिप्रिंटसाठी तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील. यासाठी 50 रुपये सर्व्हिस चार्जेस द्यावे लागतील. तुमच्याद्वारे रिक्वेस्ट केल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हाला आधार कार्ड मिळेल. मात्र हे आधार कार्ड तुमच्या रजिस्टर्ड पत्त्यावरच पाठवले जाईल.

या नवीन अ‍ॅपमध्ये ऑफलाइन केवायसी, क्यूआर कोड स्कॅन, रिप्रिंट ऑर्डर, पत्ता अपडेट करणे, आधार कार्ड व्हेरिफाय करणे, ईमेल व्हेरिफाय करणे यासारखी कामे करता येतील.

आधार अ‍ॅप 13 भाषांना सपोर्ट करते. यामध्ये इंग्रजी, हिंदी, बांग्ला, ओडिया, उर्दु, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, गुजराती, मराठी आणि असामी भाषेचा समावेळ आहे.

या अ‍ॅपमध्ये दोन सेक्शन देण्यात आले आहेत. ज्यातील आधार सर्व्हिसेज डॅशबोर्डवर ऑनलाईन सर्व्हिसेज असतील व दुसरे सेक्शन माय आधार सेक्शन हे आधार प्रोफाइल पर्सनलाइज्ड स्पेस असेल. यासाठी युजरला आधार प्रोफाइलला रजिस्टर करावे लागेल.

Leave a Comment