शाओमी लवकरच लाँच करणार आतापर्यंतचा सर्वात महागडा स्मार्टफोन

चीनची स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या बजेट स्मार्टफोनसाठी जगभरात ओळखली जाते. मात्र कंपनी आता आपला सर्वात महागडा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनचे नाव एमआय मिक्स एल्फा असेल. या फोनच्या बॅक पॅनेलमध्ये देखील युजर्सला एचडी स्क्रीन मिळेल.

कंपनीने या फोनच्या लाँचिंग संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र मार्च अखेरपर्यंत हा फोन बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 2 लाख ते 2.5 लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. मात्र फोनची खरी किंमत लाँचिंग नंतरच समोर येईल.

कंपनी या फोनमध्ये पीओएलईडी डिस्प्ले देईल. ज्याचे स्क्रीन टू बॉडी रेशिओ 180.6 टक्के असेल. यात स्नॅपड्रॅगन 855+ प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे. तर हा फोन अँड्राईड 10 वर काम करेल.

Image Credited – Businesstoday

लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या डिव्हाईसमध्ये 108 मेगापिक्सल सॅमसंग आयसोसेल ब्राइट एचएमएक्स एस5केएचएमएक्स प्रायमरी सेंसर आणि फोर एक्सिस ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन कॅमेरा सपोर्ट मिळेल. याद्वारे युजर्स 4के व्हिडीओ रेकॉर्डिंग करू शकतात. यासोबत पीडी ऑटोफोकस असलेला 12 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा मिळेल. युजर्सला यात सेल्फी कॅमेरा मिळणार नाही.

रिपोर्टनुसार, यात 12 जीबी रॅम + 512 जीबी स्टोरेज मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 4,050 एमएएच बॅटरी मिळेल, जी 40 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल.

Leave a Comment