राज्यात नाही होणार एनआरसीची अंमलबजावणी – जितेंद्र आव्हाड


ठाणे – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भिवंडीत बोलताना राज्यात एनआरसीची अंमलबजावणी देणार नाही, हा माझा शब्द असल्याचे प्रतिपादन केले. संविधान बचाव संघर्ष समितीच्या वतीने नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी व राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी कायद्या विरोधात आयोजित केलेल्या जाहीर सभेत आव्हाड बोलत होते.

‘सून ले सून ले सून ले, किस की जमीन है ये, दफन जिसके पुरखे उसकी जमीन है ये, अब तू मांगेगे सबुत मेरे देशवासी होनेका, तेरा बाप जब अंग्रेजों के तलवे चाट रहा था, तब मेरा बाप फासीके फंदे को चुम रहा था उसकी जमीन है ये’, या कवितेने आव्हाड यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.

आपल्या भाषणात मोदी सरकारवर आव्हाड यांनी घणाघाती हल्ला चढवित या देशातील असंख्य हिंदू जातीतील नागरीक आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार कोठे केले ते सांगू शकत नाही. परंतु मुस्लिम आपल्या पूर्वजांच्या कबरी दाखवू शकतात असे सांगत, महाराष्ट्रातील पारधी, कोल्हाटी समाज आज ही आपले पुरावे दाखवू शकणार नाहीत. मोदी सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ आली असून केरळ, पंजाब प्रमाणेच महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असा शब्द दिला.

Leave a Comment