…जेव्हा बदक माशांना दाणे भरवतो, पहा हा मजेशीर व्हिडीओ

सध्या एका बदकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आपल्या स्वतःच्या धान्यातून एक बदक माशांना दाणे भरवत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी देखील चकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, धान्यांनी भरलेल्या एका मोठ्या पत्र्याच्या बॉक्समध्ये बदक उभा आहे व त्याच्या खाली पाणी आहे. हा बदक आपल्या चोचीत दाणे पकडून पाण्यातील माशांच्या तोंडात टाकत आहे.

Muito lindo a natureza

Posted by Dias e Noites De Pesca on Saturday, January 11, 2020

हा व्हिडीओ कुठला आहे हे माहिती नाही. मात्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 17 लाखांपेक्षा अधिक युजर्सनी पाहिले आहे. तर हजारो युजर्सनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

ट्विटरवर देखील अनेक युजर्सनी हा मजेशीर व्हिडीओ पाहून कमेंट्स करत आहेत.

अशाच प्रकारचा एक व्हिडीओ 2015 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावेळी कॅरोलिना वॉटरफॉल रेस्कूयच्या एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर जेनेफर गार्डोन यांनी यामागचे कारण सांगितले होते.

त्यांनी सांगितले होते की, बदक माशांना भरवत आहे ही चांगली कल्पना आहे. मात्र ते असे करत नसून, ते खाण्याआधी दाणे पाण्यात बुडवत आहेत. याचवेळी मासे हे दाणे चोरण्याचा प्रयत्न करतात.

Leave a Comment