धनंजय मुंडेंचे बजाज पीक विमा कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश


बीड : पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जवळपास सात लाख शेतकऱ्यांचे विमा वाटप थकवलेल्या बजाज कंपनीवर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ओरिएंटल व बजाज या दोन्ही प्रमुख कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

मागील बैठकीत ठरल्याप्रमाणे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने 2018 चा थकीत पीकविमा वाटपास सुरुवात केली आहे. तर 90 हजार नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या पीकविम्याबाबत 27 तारखेपर्यंत लेखी याद्या देण्याचे निर्देशही मुंडे यांनी यावेळी दिले. पीक विम्याच्या थकबाकीचा प्रश्न गेल्या अनेक दिवासांपासून प्रलंबित होता. याच पार्श्वभूमीवर प्रमुख पीक विमा कंपनी ओरिएंटल आणि बजाज यांच्या प्रतिनिधींना बोलवण्यात आले होते.

Leave a Comment