मलायकाच्या या फोटोंवर तुम्ही नक्की व्हाल फिदा


नेहमीच आपल्या बोल्ड लुक आणि प्रेम प्रकरणामुळे बॉलिवूड अभिनेत्री आणि फिटनेस क्वीन मलायका अरोरा सोशल मीडियावर चर्चेत असते. आपल्या हॉट आणि बोल्ड स्टाईलमुळे मलायका बॉलीवूडमध्ये देखील एक टॉप अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नुकतेच एक फोटोशूट तिने केले आहे. मलायका आतापर्यंतच्या सर्वात बोल्ड शैलीत या फोटोशूटमध्येदिसत आहे. आपल्या इंस्टाग्रामवर मलायकाने हे फोटो शेअर केले असून, तिचे हे फोटो खूपच व्हायरल होत आहेत. मलायकाचे हे फोटोशूट नेहमीप्रमाणे स्टाईलिश आहे. तिच्या या हॉट आणि बोल्ड स्टाईलची चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रशंसा करत आहेत.


मलायकाने या फोटोशूटसाठी क्रॉप ब्लॅक टॉप आणि पिवळा कोट व त्यासोबत नेव्ही ब्लू कलरची पँट परिधान केली आहे ती ज्यामध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. अ‍ॅक्सेसरीजबद्दल बोलायचे झाले तर तिने एक सिल्वर नेकपिस निवडला आहे. न्यूड रंगाची लिपस्टिकने तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसून येते.


अनेक चाहते तिच्या या फोटोंमधील स्टाईल पाहून तिचे कौतुक करत आहेत. अनेकांनी मलायकाच्या या फोटोंकडे पाहून तिच्या फिटनेसचे कौतुक केले. विशेष म्हणजे तिच्या या फोटोवर अनेक सेलेब्स देखील कमेंट करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial) on


मलायका अभिनेता अर्जुन कपूर याला डेट करण्यासाठी चर्चेत होती, तसेच त्यांच्या लग्नाच्या बातम्याही माध्यमांमध्ये येत होत्या. अलीकडेच मलायकाने अर्जुनशी लग्न करण्याबद्दल प्रतिक्रिया देत या बातम्यांवर शिक्कामोर्तब केले आहे. सन 2020 मध्ये मलायकाला अर्जुनसोबत लग्न करण्यासंदर्भात विचार करणार असल्याचे तिने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे.

Leave a Comment