… म्हणून ट्रम्प यांनी अ‍ॅपलकडे मागितला मदतीचा हात

अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील नौदलाच्या तळावर डिसेंबर 2019 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना या हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या आयफोनची तपासणी करायची आहे. यासाठी ट्रम्प यांनी अ‍ॅपल कंपनीकडे मदत मागितली असून, ट्रम्प यांनी ट्विट केले की, आम्ही अ‍ॅपल कंपनीला व्यापार आणि दुसऱ्या मुद्यावर मदत केली आहे. कंपनीने आता आमची मदत करावी.

राष्ट्रपती ट्रम्प यांनी ट्विट केले की, अमेरिकेच्या सरकारने अ‍ॅपलला व्यापार आणि दुसऱ्या गोष्टींसाठी नेहमी मदत केली आहे. मात्र ते दहशतवादी, ड्रग डिलर व इतर गंभीर गुन्हेगारांचे फोन अनलॉक करण्यास नकार देत आहेत. अ‍ॅपलने एक पाऊल पुढे टाकून देशाला नक्की मदत करावी.

ट्रम्प आणि अ‍ॅपलचे सीईओ टिम कूक यांचे संबंध चांगले आहेत. असे असले तरी या प्रकरणात कंपनी पुर्णपणे मदत करत नसल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांचे अटॉर्नी जनरल विलियम बर्र म्हणाले की, फ्लोरिडा हल्ल्याच्या तपासासाठी आयफोन अनलॉक करण्यात कंपनी योग्य ती मदत करत नाहीये. मात्र अ‍ॅपलने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, कंपनीने डेटाचे गीगाबाईट्स उपलब्ध करून दिला असून, याद्वारे डिव्हाईसचा बॅकअप डेटा मिळवता येईल.

अ‍ॅपल कंपनीच्या तपास टीमने आयफोन अनलॉक करण्यासाठी विशेष टूल तयार करून देण्यास नकार दिला आहे. असे असले तरी सरकार आयफोन अनलॉक करण्यासाठी थर्ड पार्टीकडून देखील मदत घेऊ शकते.

Leave a Comment