डुप्लिकेट पॅन कार्ड मिळविण्यासाठी असा करा Online किंवा Offline अर्ज


पॅन कार्ड हे आर्थिक कामांशी संबंधित महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक असून पण तेच जर तुमच्याकडून गहाळ झाले तर काळजी मुळीच करु नका. डुप्लिकेट पॅन कार्ड मिळविण्यासाठी तुम्ही अर्ज करु शकता आणि ते मिळवू देखील शकता. आता डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवणे पूर्वीपेक्षा अधिक सोपे झाले आहे. ही प्रक्रिया पुर्वी फारच किचकट आणि विलंब लावणारी होती. पण आता डिजीटल जमाना असल्यामुळे ही प्रक्रिया सुकर झाली आहे. तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड Online किंवा Offline पद्धतीने मिळवू शकता. त्याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी केवळ पॅन कार्डधारक व्यक्तीच अर्ज करु शकतो. NSDL e-government किंवा आयकर विभाच्या ई-पोर्टल माध्यमातून हा अर्ज करता येऊ शकतो. आयकर विभागाच्या संकेतस्थळावर अप्लाय करण्यासाठी आपणाकडे नोंदणीकृत मोबाईल नंबर असायला हवा. आपल्याला ज्यावर ओटीपी प्राप्त होईल. डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करण्यासाठी https://www.tin-nsdl.com/ या संकेतस्थळावर आपल्याला जावे लागेल. पुढे ‘Reprint of PAN Card’ या ऑप्शनवर क्लिक करा. आता आपले विवरणपत्र दिसेल. पुढे एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ओटीपी हवा काय असे विचारण्यात येईल. त्यावर क्लिक करा आपल्याला पॅन कार्ड क्लिक करण्याची पुष्टी करण्यासाठी विचारण्यात येईल. त्यावर क्लिक करा. आता तुमचा ओटीपी तयार होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, हा ओटीपी केवळ 10 मिनिटांसाठीच वैध असेल आणि तो तुमच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा इमेलवर तुम्हाला प्राप्त होईल.

ओटीपी प्राप्त झाल्यानंतर तो विविध ठिकाणी भरुन क्लिक करावे लागेल. तुमचे पॅन कार्ड तयार असल्याचा संदेश तुमच्या स्किरनवर दिसेल. आता तुम्ही तुमचे पॅन कार्ड डाऊनलोड करु शकता. त्यासंबंधीची पुष्टी करणारा मेसेज तुमच्या नोदणीकृत मोबाईल किंवा ईमेलवर प्राप्त झालेला असेल.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी टीआयएन सुविधा केंद्र, आयटी पॅन सेवा केंद्रे किंवा पॅन केंद्रांवर जाऊन आपण सेवा घेऊ शकता. त्याचबरोबर आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईट्स www.incometaxindia.gov.in , www.utiitsl.com किंवा www.tin-nsdl.com आदींवरही तुम्ही ऑफलाइन अर्ज भरु शकता. ज्यामुळे तुम्हाला डुप्लिकेट पॅन कार्ड प्राप्त होऊ शकेल.

Leave a Comment