ग्लॅमरस फोटो शेअर करुन पुन्हा एकदा चर्चेत आली हार्दिक पांड्याची होणारी बायको


नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियाचा धडाकेबाज क्रिकेटर हार्दिक पांड्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक हिच्याशी त्याने साखरपुडा केला होता. त्याचे चाहते देखील या बातमीमुळे बुचकळ्यात पडले होते. दुबईमध्ये एका स्पीडबोटवर दोघांनी साखरपुडा केला होता. त्यांनी ज्याचे व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केले होते.

View this post on Instagram

🔥❤️ #throwback😍 @hardikpandya93

A post shared by 🎀Nataša Stanković🎀 (@natasastankovic__) on


साखरपुडा झाल्यापासून एकमेकांसोबतचे फोटो दोघेही सोशल मीडियावर शेअर करत आहेत. नताशाने नुकताच हार्दिकसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दोघेही ज्यामध्ये बीच साइडवर उभे असल्याचे दिसत आहेत. नताशाने या फोटोमध्ये मोनोकिनी घातल्याचे दिसून येत आहे. तिने यासोबतच आपले केसही मोकळे सोडले आहेत. तर दुसरीकडे हार्दिक शॉर्ट्स घातलेला पाहायला मिळत आहे. दोघांनीही यावेळी डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल चढवला आहे. दोघांनी या फोटोमध्ये एकमेकांच्या कमरेभोवती आपले हात ठेवले आहेत. हा फोटो नताशाने शेअर केल्यानंतर हार्दिकने कमेंटमध्ये हार्टची इमोजी टाकली आहे.

Leave a Comment