डोंगराच्या कड्यावर बांधलेला रस्ता बनला जगातील 9वे आश्चर्य


चीनमधील एका डोंगराच्या कड्यावर बांधलेल्या रस्त्याला जगातील 9वे आश्चर्य बनण्याचा मान मिळाला आहे. गुओलियांग डोंगराच्या कड्यावर बांधलेला हा रस्ता समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंच आणि 1.2 किलोमीटर लांब आहे. त्याच्या अवघड आणि धोकादायक बांधकामामुळे त्याचा समावेश आश्चर्यांमध्ये झाला आहे.

चीनच्या हेनान प्रांतातील हुक्षियान काऊंटी येथे हे गुओलियांग गाव आहे. हे गाव बाकी जगापासून वेगळे पडले आहे. या डोंगरावरून खाली येण्यासाठी गावकऱ्यांना तीक्ष्ण चढ-उतार असलेली दरी ओलांडावी लागत होती.

गावकऱ्यांनी 1972 साली स्वतःच रस्ता खोदण्याचा निर्णय घेतला. शेन मिंगक्षिन या गावकऱ्याच्या नेतृत्वाखाली त्यांनी रस्ता खोदायला सुरूवात केली. कोणतेही प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांच्यासाठी या रस्त्याचे बांधकाम अत्यंत धोकादायक होते. या कामात काही जणांचा मृत्यूही झाला. अखेर 1977 साली या रस्त्याचे काम पूर्ण झाले.

आता हा रस्ता पर्यटन केंद्र बनला असून हे काम पूर्ण करणाऱ्या 14 जणांची कथा ही पर्यटकांसाठी आकर्षणबिंदू ठरली आहे., असे स्पुटनिक या संकेतस्थळाने म्हटले आहे.

Leave a Comment