जपानमधील १ कोटीची नोकरी सोडून बनला आयपीएस


उत्तर प्रदेशातील मिर्जापूर जिल्ह्यात २०१२ बॅचचे आयपीएस आशिष तिवारी हे पोलीस अधीक्षक या पदावर कार्यरत आहेत. देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी लंडन आणि जपानच्या बँकेमधील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून भारतात परत आले. ते त्या बँकेत एक्स्पर्ट ऍनालिस्ट पॅनलमध्ये होते. त्यांनी दोनदा आयपीएस परीक्षा दिली आणि त्यात त्यांना यश देखील मिळाले. आशिष यांनी ते प्रश्न शेअर केले ज्याच्यामुळे ते आयपीएस झाले. वाचूया काय आहे त्यांनी यशोगाथा….

आशिष हे मुळचे मध्य प्रदेशाच्या इटारसीचे रहिवाशी असून त्यांचे वडील कैलाश नारायण तिवारी रेल्वे इटारसी सेक्शन इंजिनिअर आहेत. आशिष यांचे १२वी पर्यंतचे शिक्षण केंदीय विद्यालयात झाले. त्यानंतर २००२-२००७ पर्यंत त्यांनी कानपूर आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्समधून बीटेक आणि त्यानंतर एमटेक पूर्ण केले.

२००७मध्ये त्यांचे कॅम्पस सिलेक्शनमध्ये लंडनच्या लेहमन ब्रदर्स कंपनीमध्ये सिलेक्शन झाले. जिथे त्यांनी दीड वर्ष काम केले. त्यानंतर जपानमधील नोमुरा बँकेत दीड वर्ष काम केले. दोन्ही बँकेत त्यांचे एक्स्पर्ट ऍनालिस्ट पॅनलमध्ये सिलेक्शन झाले होते.
२०१०मध्ये आशिष भारतात परत आले आणि त्यांनी सिव्हील सर्व्हिसची तयारी सुरु केली आणि २०११मध्ये त्यांची आयआरएस इन्कम टॅक्समध्ये सिलेक्शन झाले. ज्यामध्ये त्यांचा ३३० वा क्रमांक होता. त्यानंतर २०१२मध्ये त्यांचे आयपीएस म्हणून सिलेक्शन झाले. त्यात ते २१९व्या क्रमांकावर होते. २०१३मध्ये त्यांचे आयपीएस ट्रेनिंग दरम्यान पुन्हा एकदा आयपीएसमध्ये सिलेक्शन झाले आणि ते त्या २४७व्या क्रमांकावर होते.

मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी आशिष यांनी काही बहुमुल्य टिप्स दिल्या आहेत.
बायोडेटातील एका-एका शब्दाची तयारी करा आणि चालू घडामोडींची माहिती ठेवा.
आपल्या विषयाची संपूर्ण तयारी करा.
जेव्हा तुम्ही प्रश्नाचे उत्तर द्याला तेव्हा लक्षात असू द्या की समोरचा व्यक्ती पुढचा प्रश्न काय विचारणार आहे.
उत्तर देतेवेळी समोरच्या व्यक्तीला आपल्या मजबूत विषय कडे नेण्याचा कल ठेवा
समोरच्या व्यक्तीसमोर शांत बसा आणि ज्ञानी बनू नका, कारण त्यामुळे समोरच्याला वाटेल की तुम्ही अजून शिकत आहात.
खोटे बोलू नका आणि अनुमान तर अजिबात लावू नका. सर्व उत्तरात सकारात्मक विचार ठेवा. आपला आत्मविश्वास मजबूत ठेवा.
उत्तर येत नसेल तर मला येत नाही असे नम्रपणे सांगा.

Leave a Comment