
तेहरान – इराणची राजधानी तेहरानजवळ युक्रेनचे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती इराणच्या सरकारी वृत्तवाहिनीने दिली आहे. विमान तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळ कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.
युक्रेनचे प्रवासी विमान तेहरानजवळ दुर्घटनाग्रस्त
स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला तेहरान विमानतळावरून युक्रेनचे आंतरराष्ट्रीय फ्लाईट ७५२ उड्डान घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डान घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर ते उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात विमान कोसळले.
