जेएनयू विद्यार्थ्यांची दीपिका पादुकोणने घेतली भेट


नवी दिल्ली – जेएनयूमध्ये झालेल्या हिंसेचा अभिनेत्री दीपिका पादुकोणने कठोर शब्दात निषेध केला आहे. तिने या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ देशभर सुरू असलेल्या आंदोलनालाही पाठिंबा दर्शवला. ती विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जेएनयू कँपसमध्ये दाखल झाली. मोठ्या संख्येने विद्यार्थी यावेळी एकत्र जमा झाले आणि जोरदार घोषणाबाजी केली.


जेएनयू कँपसमध्ये घुसून अज्ञात गुंडांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केल्यामुळे अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते. जेएनयू विद्यार्थी युनियनची अध्यक्षा आईशी घोष हिलाही गंभीर दुखापत झाली होती. दीपिकाने रुग्णालयातून उपचार घेऊन परतलेल्या आईशीची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी खूप जल्लोष केला.


जेएनयू कॅपसमध्ये सध्या दहशतीचे वातावरण असले तरी मोठ्या संख्येने गुंडागर्दीला विरोध करण्यासाठी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अभिनेत्री दीपिका पादुकोणने हजेरी लावली आणि आपला पाठिंबा दर्शवला. सध्या प्रचंड पोलीस बंदोबस्त जेएनयू कँपसमध्ये तैनात करण्यात आला आहे. एक प्रकारे दहशतीचे वातावरण येथे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अभिनेत्री दीपिकाने जेएनयू गाठले आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

Leave a Comment