घर बसल्या असा करा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज

तुम्ही कोणतेही वाहन चालवत असाल, तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर तुम्हाला भरभक्कम दंड भरावा लागू शकतो. त्यामुळे लायसन्स नसेल तर त्वरित लायसन्स काढणे गरजेचे आहे. ड्रायव्हिंग लासयन्ससाठी तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑनलाईन अर्ज कसा करू शकता त्याविषयी जाणून घेऊया.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी महत्त्वपुर्ण कागदपत्रे –

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुमच्याकडे रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधार कार्ड, विजेचे बिल, पॅन कार्ड, पाण्याचे बिल इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

Image Credited – Amarujala

वेबसाईट –

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारची अधिकृत वेबसाईट sarathi.parivahan.gov.in/ वर जावे लागेल. तेथे तुम्ही तुमचे राज्य निवडू शकता.

Image Credited – Amarujala

यानंतर एप्लाय ऑनलाईन या पर्यायावर क्लिक करा.

यानंतर तुमच्यासमोर न्यू ड्रायव्हिंग लायसन्स असा पर्याय दिसेल, तो निवडा.

Image Credited – Amarujala

न्यू ड्रायव्हिंग लायसन्स पर्यायावर क्लिक केल्यानंतर Continue या पर्यायावर क्लिक करा.

Image Credited – Amarujala

येथे तुमचा मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हा ओटीपी येईल.

Image Credited – Amarujala

यानंतर तुम्हाला Learner’s Licence Number आणि जन्मतारीख द्यावी लागेल.

Image Credited – Amarujala

ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सचा फॉर्म भरावा लागेल. तेथे मागितलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स चाचणीसाठी तुमच्या सोयीनुसार तारीख निवडावी लागेल. यासाठी तुम्हाला ऑनलाईनच फी भरावी लागेल. त्यानंतर तुम्ही निवडलेल्या तारखेला तुम्हाला आरटीओ ऑफिस जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागेल.

 

Leave a Comment