जगातील सर्वात उंच इमारतीत शर्लिन चोप्राने घेतले घर


दुबई : दुबईतील बुर्ज खलिफाचा जगातील सर्वात उंच इमारतीच्या यादीत पहिला नंबर लागतो. बुर्ज खलिफासारख्या इमारतीत आपले घर असावे अशी जगातील श्रीमंत व्यक्तींची इच्छा असते. दुबईमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही भव्य आणि सुंदर दिसणाऱ्या इमारतीत स्वतःचे घर घेतले आहे. आता सुपरहॉट आणि आपल्या बोल्ड अदांनी घायाळ करणारी अभिनेत्री शर्लिन चोप्राच्या नावाचा या यादीत समावेश झाला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेत्री शर्लिन चोप्राने स्वत: ला बुर्ज खलिफामध्ये एक सुंदर अपार्टमेंट गिफ्ट केले आहे.

View this post on Instagram

Earlier today.. ❤️ #bootilicious 🔥

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on


आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शर्लिन चोप्राने याबाबतची माहिती दिली आहे. शर्लिनचे घर सर्व सुविधांसह अतिशय भव्य आणि सुंदर आहे. लवकरच मनोरंजन क्षेत्रात शर्लिन चोप्रा स्वतःचे ओटीटी प्लॅटफॉर्म लाँच करणार आहे.


टाईम्स ऑफ इंडियाने शर्लिनने बुर्ज खलिफामध्ये घर घेतल्याचे वृत्त दिले आहे. मला दुबईत बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा सल्ला दुबईत राहणाऱ्या माझ्या एका मित्राने दिला. माझे नेहमीच स्वप्न होते की मी जिथे नेहमी जाते तिथे माझे स्वत:चे घर असावे. दुबई माझ्या सर्वाधिक पसंतीचे शहर असल्चाचे शर्लिन म्हणाली. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शर्लिनने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हा फोटो सुद्धा तिने बुर्ज खलिफामध्येच क्लिक केला आहे. शर्लिनच्या फ्लॅटबाहेरचाच हा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे. पण त्याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

View this post on Instagram

#curvilicious 👅 Trainer matters! @yougessh 💪

A post shared by Sherlyn Chopra (@sherlynchopra) on


बुर्ज खलिफासारख्या ठिकाणी घर घेण्यासाठी शर्लिनने मोठी रक्कम मोजली आहे. अन्य वेबसाईटवरील माहितीनुसार बुर्ज खिलामध्ये 2BHK घराची किंमत जवळपास 15 कोटी रुपये आहे. पण हे घर शर्लिनने किती रुपयांना घेतले, याबाबतची माहिती जाहीर न केल्यामुळे शर्लिनच्या घराची किंमत किती, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Leave a Comment