अरेच्चा ! 20 वर्ष जुना बर्गर आजही आहे एकदम ताजा

एखादा खाद्यपदार्थ 4-5 दिवस झाले की खराब होतो व जुना दिसू लागतो. मात्र अमेरिकेतील एका व्यक्तीने दावा केला आहे की त्याच्याकडे 20 वर्ष जुना हॅम्बर्गर आहे व तो आजही नवीन अर्थात ताजा असल्यासारखा दिसतो. डेव्हिड व्हिपल या व्यक्तीने हा दावा केला असून, त्याने हा बर्गर लोगन येथून खरेदी केला होता. हा बर्गर आजही फ्रेश दिसत आहे, मात्र याचा कारबोर्डप्रमाणे वास येत आहे.

व्हिपलने सांगितले की, त्याने 1999 मध्ये एंजाइम्सच्या चाचणीसाठी बर्गर खरेदी केला होता. मात्र बर्गर कोटमध्येच राहिला व कोट गाडीच्या मागील भागात राहिला. गाडी लोगन येथे होती.

त्यानंतर ते लोगनवरून सेंट जॉर्ज (ऊताह) येथे राहिला आले. एकेदिवशी त्यांच्या पत्नीने कोट देत सांगितले की, यात काहीतरी आहे. पाहिल्यावर त्यात बर्गर असल्याचे आढळले. एवढ्या वर्षानंतर देखील बर्गर जसाच्या तसा होता. याआधी बर्गर 2013 मध्ये काढण्यात आला होता व त्याला एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर आता हा बर्गर समोर आला आहे.

याआधी देखील आइसलँडमधील 10 वर्ष जुन्या बर्गरचे फोटो व्हायरल झाले होते.

Leave a Comment