या सोप्या ४ पद्धतीने तपासून पहा पीएफ खात्याचे तपशील


कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) खातेदारांना आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात किती रक्कम जमा झाली आहे. त्याचबरोबर त्यावर व्याजदर योग्य प्रमाणात मिळत आहे की नाही. त्यातच जर तुम्हाला त्या रक्कमेतून उचल घ्यायची असेल तर किती उचल घेता येईल अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आता चार वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. आज आम्ही तुम्हाला त्याच चार पद्धतीन बद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा नक्कीच फायदा होईल. वेबसाईट, अॅप, एसएमएस आणि मिस कॉल या चार प्रकारे पीएफचा बॅलन्स तुम्हाला तपासून पाहता येईल.

वेबसाईटच्या माध्यमातून पीएफ खात्याचा तपशील तपासण्यासाठी ईपीएफच्या अधिकृत https://epfindia.gov.in/site_en/index.php या वेबसाईटला भेट द्या. त्यासाठी तुमच्याकडे अॅक्टिवेट युनिव्हर्सल अकाउंट नंबर असण्याची गरज आहे. हा क्रमांक ईपीएफओ देते व एम्प्लॉयर तो अॅक्टिवेट करतो. नोकरी बदलली तरी हा युएएन क्रमांक बदलत नाही, तो कायम राहतो. तुम्ही या पोर्टलवर तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाइलच्या माध्यमातून पासवर्ड सेट करू शकता आणि नंतर तिथे दिलेल्या सूचनांनुसार पासबुकच्या माध्यमांमधून पीएफ बॅलन्स चेक करू शकता. वेबसाईटवर गेल्यावर ‘Our Services’ टॅबवर क्लीक करा. त्यानंतर For Employees या पर्यायावर क्लीक करा. ‘Services या पर्यायावर क्लीक करून ‘Member passbook’ हा पर्याय निवडावा. युएएननंबर आणि पासवर्डने लॉगइन करा

वेबसाईटच्या माध्यमातून पीएफ खात्याचा तपशील तपासण्यासाठी ईपीएफओचे अॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून मेंबर लॉगइनच्या ऑप्शनमधून बॅलन्स चेक करण्याची सुविधा उपलब्ध आहे. येथेही नोंदणी असलेल्या मोबाइलच्या माध्यमातून जोडणी केली जाते.

एसएमएसच्या माध्यमातून पीएफ खात्याचे तपशील केवायसी डिटेल्स पूर्ण झाले असतील तरच जाणून घेता येतो. EPFOHO UAN ENG असा मेसेज टाइप करायचा ENG च्या जागी MAR टाइप केले तर मराठीत माहिती मिळेल. आपला UAN त्यात टाकून हा मेसेज 7738-299-899 वर पाठवून द्यायचा आहे. त्याचबरोबर 011-22901406 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाइलवरून मिस कॉल दिल्यावर एसएमएस येतो आणि पीफ खात्याचे तपशील तुम्हाला कळवल्या जातात.

Leave a Comment