अमेरिकेच्या चुकीला माफी नाही, इराणचा निर्धार


बगदाद – इराणचे टॉप कमांडर मेजर जनरल कासिम सुलेमानी अमेरिकेच्या एरिअल स्ट्राईकमध्ये ठार झाले आहेत. आखातामध्ये अमेरिकेच्या या कारवाईमुळे पुन्हा एकदा दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होणार आहे. आक्रमक भूमिका घेत शांत बसणार नसल्याचे संकेत इराणनेही दिले आहेत. अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याचा निर्धार इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खोमेनी यांनी बोलून दाखवला आहे.

इराणच्या कद्स फोर्सचे मेजर जनरल कासिम सुलेमानी प्रमुख होते. कासिम सुलेमानी यांचा ताफा शुक्रवारी सकाळी बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात असताना अमेरिकेकडून हवाई हल्ला करण्यात आला. त्यामध्ये कासिम सुलेमानी ठार झाले.

आयातुल्ला खोमेनी यांनी कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर काही ट्विटस केले आहेत. त्यांनी यात सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहताना अमेरिकेला इशारा दिला आहे. एवढी वर्ष त्यांनी अथक मेहनत घेतली. शहीद होणे हा एक पुरस्कार असल्याचे खोमेनी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. खोमेनी यांनी देशामध्ये तीन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. इराणची वाटचाल सुलेमानी यांचे काम आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावरुन पुढेही सुरु राहिल. हे कृत्य ज्या गुन्हेगारांनी केले आहे, त्यांना सोडणार नसल्याचा, असा निर्धार खोमेनी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये बोलून दाखवला आहे.

Leave a Comment