धनंजय मानेंची सोशल मीडियावर एंट्री


आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटविणारे अशोकमामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांचे आज असंख्य चाहते आहेत. अनेक सेलिब्रिटी सध्याच्या काळात आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सर्रास सोशल मीडियाचा वापर करतात. पण या प्लॅटफॉर्मवर अशोक सराफ कुठेच न दिसल्यामुळे त्यांनी फेसबुक, इन्स्टाग्रामवर यावे अशी चाहत्यांची इच्छा होती. अखेर २०२० ला चाहत्यांची ही इच्छा पूर्ण झाली आहे. इन्स्टा आणि फेसबुकवर अशोक सराफ यांनी पदार्पण केले आहे.


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापूरे यांचा आगामी ‘प्रवास’ हा चित्रपट येत आहे. अशोक सराफ यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने सोशल मीडियावर पदार्पण केले आहे. त्यांचे फेसबुकवर ashoksarafofficial या नावाने अकाऊंट असून #realashoksaraf या नावाने इन्स्टाग्रामवर त्यांचे खातं आहे. २ जानेवारी २०२० रोजी इन्स्टावर त्यांनी एक पोस्ट शेअर करत ‘हो. धनंजय माने इथेच राहतात’, असे म्हटले होते.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर येण्यास मला बऱ्याच जणांनी सांगितले होते. पण त्यापासून मीच लांब राहत होतो. या सगळ्यापासून लांबच बरे असे मला वाटायचे. पण मित्रांच्या, चाहत्यांच्या संपर्कात राहता यावे यासाठी आता या प्लॅटफॉर्माचा वापर करावा असे वाटले आणि मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह झाल्याचे अशोक सराफ यांनी म्हटले आहे.

Leave a Comment