भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या हा सध्या त्याच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. आता आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डेट करत असलेल्या अभिनेत्रीचा फोटो हार्दिक शेअर केला आहे. हार्दिकने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवीन वर्षाच्या मुहूर्तावर अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टेनकोविकसोबतचा फोटो शेअर करत नात्याची कबूली दिली आहे. त्याने फोटो शेअर करत माझ्या फायरवर्कसोबत नवीन वर्षाची सुरुवात, असे कॅप्शन दिले आहे. पण बॉलीवूडच्या कोणत्या चित्रपटात हार्दिकची गर्लफ्रेंड नताशाने काम केले आहे? आणि ती कशी दिसते? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडले असतील. याआधी दिलेल्या बातमीत आम्ही तुम्हाला तिने काम केलेल्या चित्रपटाबद्दल सांगितले होते आता तिचे काही हॉट फोटो जे तिच्या इंस्टाग्रामवर आहेत ते तुमच्यासाठी आणले आहेत.