आता रेल्वेत प्रवासादरम्यान घ्या आवडत्या चित्रपट-गाण्यांचा आनंद

राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या प्रिमियम रेल्वेमध्ये प्रवास करताना आता प्रवाशी आवडीचे चित्रपट पाहू शकतील व गाणे ऐकू शकतील. रेल्वेमध्ये ऑन डिमांड कंटेटची सुविधा एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे. ही सेवा मोफत असेल. रेल्वेच्या जाहिरातींद्वारे याची कमाई केली जाईल. तसेच हिवाळ्यात धुक्यामुळे रेल्वे अनेकदा उशीर येतात, ही समस्या संपवण्यासाठी रेल्वे आता फॉग व्हिजन डिव्हाईसचे ट्रायल करत आहे. ट्रायल यशस्वी झाल्यास 20 जानेवारीनंतर 25 रेल्वेमध्ये ही डिव्हाईस लावले जाईल.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन वीके यादव यांनी सांगितले की, यासाठी टेंडर जारी करण्यात आले असून, लवकरच कंटेट प्रोव्हाइडरची निवड केली जाईल. हे प्रोव्हाईडर रेल्वेत हॉट स्पॉट लावतील. हे हॉच स्पॉच प्रवाशांच्या आयपॅड, मोबाईल लॅपटॉपशी कनेक्ट असतील. प्रवाशांना एक अप डाउनलोड करावा लागेत. त्यानंतर ते आपल्या आवडीचा चित्रपट पाहू शकतील.

ही सुविधा राजधानी, दुरांतो, शताब्दी, वंदे भारत सारख्या लांब प्रवासाच्या रेल्वेमध्ये उपलब्ध असेल. कंटेटमधील काही भाग सरकारी योजनांच्या जाहिराती आणि कंपनीची जाहिरात असेल. यातून होणारा फायदा कपंनी रेल्वेला देखील देईल. याद्वारे प्रवाशी आणि रेल्वे दोघांना फायदा होईल.

दुसरीकडे रिसर्च डिझाईन अँन्ड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन लखनऊद्वारे तयार करण्यात आलेले फॉग व्हिजन डिव्हाईसला दिल्लीतून सुरू होणाऱ्या रेल्वेमध्ये ट्रायल घेण्यात येईल. ट्रायल यशस्वी झाल्यास पश्चिम-मध्य रेल्वे झोनच्या काही रेल्वेंमध्ये याचा वापर केला जाईल.

या डिव्हाईससोबत प्रोग्रामिंग बॉक्स असेल. डिव्हाईसमध्ये अडचण निर्माण करणाऱ्या जसे की, गाई, बोल्डर यांच्या आर्टिफिशियल फोटो सेव्ह असतील. जसेच ट्रॅकवर काही दिसेल त्याची माहिती स्क्रीनवर दिसेल. हे डिव्हाईस जीपीएसच्या माध्यमातून चालते. या डिव्हाईसमध्ये इंफ्रारेड टेक्नोलॉजीचा वापर केल्याने धुक्यात देखील ट्रॅक दिसतो.

Leave a Comment