हार्दिकने भरसमुद्रात उरकला साखरपूडा


नवी दिल्ली – सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली. या दोघांनी साखरपूडा केला असून लवकरच ते विवाहबद्ध होणार असल्याचे वृत्त आहे. साखपूड्याची माहिती हार्दिकने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली.

नताशासोबतचा एक फोटो हार्दिक पांडयाने बुधवारी आपल्या अधिकृत्त इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला. त्याने त्याला ‘मै तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान…असे मजेशीर कॅप्शनही शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. समुद्रात हार्दिक आणि नताशा क्रुझवर मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.


दरम्यान, हार्दिकच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हार्दिकला भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने देखील शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी हार्दिकने नताशासोबतचा फोटो शेअर करुन प्रेमाची कबुली दिली होती. सध्या दुखापतीमुळे हार्दिक भारतीय संघाबाहेर आहे. त्याने दुखापतीतून सावरुन क्रिकेटच्या सरावाला सुरूवात केली आहे. आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्व चषक स्पर्धेसाठी हार्दिक भारतीय संघात परतेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.

Leave a Comment