मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्ती विरोधात टाटा सन्सची सर्वोच्च न्यायालयात याचिका


नवी दिल्ली – टाटा सन्सने सायरस मिस्त्री यांच्या पुनर्नियुक्तीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. टाटा समूहातील शंभराहून अधिक कंपन्या सांभाळणाऱ्या टाटा सन्स लिमिटेडच्या अध्यक्षपदावरून मिस्त्री यांच्या हकालपट्टीचा निर्णय राष्ट्रीय कंपनी विधि अपील न्यायाधिकरणाने बेकायदेशीर ठरवला होता. आता या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी टाटा सन्सने केली आहे.

सायरस मिस्त्री यांना तीन वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षांत दिलासा मिळाला होता. टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष हे मूळ पद सायरस मिस्त्री यांना पुन्हा बहाल केले जावे, असे सांगून सध्याचे अध्यक्ष एन. चंद्रशेखर यांची त्या जागी केली गेलेली नियुक्तीही न्यायाधिकरणाने बेकायदेशीर ठरवली होती. तथापि, टाटांना या निकालाविरोधात अपिलासाठी चार आठवडय़ांचा कालावधीही अपील न्यायाधिकरणाने बहाल केला होता.

Leave a Comment