या बँकेत मिळते बिनव्याजी कर्ज

इस्लाममध्ये व्याज म्हणून पैसे देण्यास मनाई आहे. कारण इस्लाममध्ये व्याजाला हराम म्हटले आहे. विचार करणारी गोष्ट आहे की, मग ज्या देशात शरियाला कायदा मानले जाते तेथे बँकिंग कसे होते ? या देशांमध्ये देखील बँकिंग होते, मात्र तेथील नियम वेगळे आहेत. याला इस्लामिक बँकिंग म्हटले जाते.

भारतात देखील शरियाच्या आधारावर बँकेच्या स्थापनेचा विचार सुरू होता. मात्र त्याचे पुढे काहीही झाले नाही. याविषयी आरबीआयने आरटीआयमध्ये म्हटले की, बँकांना यासाठी अनुमती देण्यात आली नाही कारण बँकिंग आणि आर्थिक सेवांमध्ये सर्वांना समान संधी आहे. इस्लामिक बँकिंग कायदा केवळ इस्लाम मानणाऱ्यांसाठीच आहे.

कसे काम करते इस्लामिक बँकिंग ?

इस्लामिक बँकिंगमध्ये बँक केवळ पैशांचे ट्रस्टी असतात. त्यामुळे जे लोक बँकेत पैसे जमा करतात, ते केव्हाही पैसे काढू शकतात. या बँकिंग प्रणालीमध्ये बचत खात्यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. मात्र खात्यातील पैशांमुळे बँकेला काही फायदा झाला तर बँक त्यासाठी तुम्हाला काहीतरी भेटवस्तू देते. मात्र जर बँकेला काही नुकसान झाले तर याचा फटका ग्राहकांना देखील बसतो.

इस्लामिक कायद्यात कर्ज घेणाऱ्या आणि कर्ज देणाऱ्या दोघांना नुकसानीचा धोका असतो. जर पैसे बुडाले तर त्याची जबाबदारी दोघांची असते. कर्ज घेतले तर त्याची मुळ रक्कमच जमा करावी लागते, बँक त्यावर कोणतेही व्याज आकारत नाही.

जर बँक व्याजच घेत नाही तर त्यांचा खर्ज कसा चालतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. इस्लामिक बँकेचे नियम वेगळे आहेत. समजा, तुम्हाला घर खरेदी करायचे आहे आणि यासाठी तुम्ही अर्ज केल्यावर बँक तुम्हाला कर्ज देण्याऐवजी थेट घरच खरेदी करून देते. मात्र घर तुम्हाला थोड्या अधिक किंमतीत मिळते. यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला हफ्ता द्यावा लागतो. मात्र अधिक किंमतीत तुम्हाला घर दिल्याने बँकेला जो फायदा झाला त्याने बँकेचा खर्च भागतो व कर्मचाऱ्यांना पगार देखील दिला जातो.

इस्लामिक कायद्यानुसार, पैसे कमविण्याचे तीन साधन सांगितले आहेत – शेती, शिकार आणि खाण. यानुसार ठेवी, व्याज देणारी सिक्युरिटीज म्हणजेच बाँड्स, डिबेंचर्स इत्यादी गोष्टींना देखील परवानगी नाही. या बँका घर, दुकान, जमीन इत्यादी गोष्टींमध्ये गुंतवणूक करतात. इस्लामिक बँकेत जुगार, दारू सारख्या व्यवसायात देखील गुंतवणूक करण्यास मनाई आहे.

Leave a Comment