सत्ताधारी सरकारच्या आदेशानुसार काम करावे लागते – बिपिन रावत


नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून संरक्षण प्रमुखपदी (चीफ ऑफ डिफेन्स) जनरल बिपीन रावत यांची निवड करण्यात आली असून त्यांनी आज पदभार स्वीकारला आहे. त्यांना भारतीय लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. जनरल बिपिन रावत लष्करप्रमुख पदावरुन मंगळवारी निवृत्त झाले. लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची जनरल बिपिन रावत यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. मंगळवारी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देत जनरल बिपिन रावत यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली होती.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बिपीन रावत यांनी माझ्यावर लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये समनव्य ठेवण्याची जबाबदारी आहे. एक टीम म्हणून तिन्ही दल एकत्र काम करतील असा विश्वास व्यक्त केला. तुमच्यावर ठराविक राजकीय विचारसरणीचा प्रभाव असल्याच्या आरोपांसंबंधी बिपिन रावत यांना यावेळी विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, राजकारणापासून लष्कर दूर राहते. पण सत्ताधारी सरकारच्या आदेशानुसार आम्हाला काम करावे लागते.

Leave a Comment