दिल्लीच्या ‘या’ मेट्रो स्थानकाला मिळणार सर्वोच्च न्यायालयाचे नाव


नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील प्रगती मेट्रो स्टेशन यापुढे आता सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन या नावाने ओळखले जाणार आहे. प्रगती मेट्रो स्टेशनचे नाव बदलून सर्वोच्च न्यायालय मेट्रो स्टेशन करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी यासंबंधी घोषणा केली. त्यांनी यावेळी नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसेच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती दिली.

यावेळी मुबारक चौकाला शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचे नाव देण्यात येणार असल्याचे मनिष सिसोदिया यांनी जाहीर केले. मुबारक चौक आणि फ्लायओव्हरचे नामकरण करुन शहीद कॅप्टन विक्रम बत्रा चौक असे करण्यात आले आहे. कारगिल युद्धात कॅप्टन विक्रम बत्रा शहीद झाले असल्याचे यावेळी मनिष सिसोदिया यांनी सांगितले.

Leave a Comment