अरे देवा ! मुलीने 2 कोटींची अंगठी स्विकारली, पण नात्याला दिला नकार

Image Credited – thesun

मुलीला लग्नाविषयी अथवा प्रेमाविषयी प्रपोज करताना मुली अनेकदा महागडी देऊन प्रपोज करत असतात. मात्र समजा, मुलीने ती अंगठी स्वतःकडेच ठेवली आणि तुमच्या प्रपोजलला नकार दिला तर ? एका मुलीने असे केले आहे. लंडनमध्ये राहणारी मॉडेल अमंडा क्रोनिनला एका अनोळखी व्यक्तीने रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवला होता. दोघे पहिल्यांदा न्युयॉर्कच्या एका हॉटेलमध्ये भेटले होते. तिने 2 कोटी रुपयांपेक्षा अधिक मुल्याची अंगठी तर स्विकारली मात्र व्यक्तीच्या प्रपोजलला नकार दिला आहे.

या अनोळखी व्यक्तीने अमंडाला Van Cleef & Arpels ब्रँडची अंगठी दिली होती. या अंगठीची किंमत 2 कोटी 33 लाख रुपये आहे. अमंडा इंस्टाग्राम मॉडेल म्हणून लोकप्रिय आहे.

Image Credited – thesun

तिने याविषयी सांगितले की, प्रपोज करणारा व्यक्ती यूरोपमधील सर्वात शक्तीशाली व्यक्तींपैकी एक आहे. त्या व्यक्तीने आपले नाव सांगितले व नंबर देखील दिला. दुसऱ्या दिवशी अमंडाने त्या व्यक्तीला मेसेज केल्यावर त्याने अनेक प्रेमाचे मेसेज पाठवले.

अमंडाने सांगितले की, तिला समजले होते की त्या व्यक्तीला पत्नी आहे. त्यामुळे तिने त्या व्यक्तीला भेटण्यास नकार दिला. यानंतर ती व्यक्तीने लग्न तोडण्यास देखील तयार झाली. त्या व्यक्तीने अमंडाला मागणी देखील घातली.

लंडनमध्ये अमंडाला भेटल्यावर त्या व्यक्तीने तिला महागड्या अंगठीसह प्रपोज केले. तिने सांगितले की, ते खूप विचित्रच होते. मला अंगठी परत करायची होती. मात्र त्या व्यक्तीने मी अंगठी ठेवली तर मला आवडेल असे सांगितले.

Leave a Comment