स्वच्छ सर्वेक्षणात देशातील या शहराने मारली बाजी

Image Credited – moneycontrol

स्वच्छ सर्वेक्षण लीग 2020 च्या दोन तिमाहीतील सर्वेक्षणात देशातील 4 हजार हजार अधिक शहरांपैकी इंदौर शहराने स्वच्छतेमध्ये बाजी मारली आहे. गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्री हरदिप सिंह यांनी याविषयी माहिती दिली. इंदौर सलग चौथ्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर आहे.

10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये एप्रिल ते जून 2019 या पहिल्या तिमाहीत पहिल्या तीन स्थानांवर इंदौर, भोपाल आणि सुरत या शहरांची कामगिरी चांगली होती. तर जुलै ते सप्टेंबर 2019 या दुसऱ्या तिमाहीत इंदौरने आपले पहिले स्थान कायम ठेवले. तर दुसऱ्या स्थानावर राजकोट आणि तिसऱ्या स्थानावर नवी मुंबई राहिले.

दुसऱ्या तिमाहीत भोपाल दुसऱ्या स्थानावरून 5व्या स्थानावर घसरले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात 4273 शहरी महानगरपालिकांनी भाग घेतला होता.

महाराष्ट्रातील शहरांमध्ये नाशिक सर्वेक्षणाच्या पहिल्या लीगमध्ये देशात चौथ्या आणि दुसऱ्या लीगमध्ये सातव्या स्थानावर होते.

आतापर्यंत स्वच्छ सर्वेक्षणात भाग न घेणारे पश्चिम बंगाल देखील पुढीवर्षी होणाऱ्या सर्वेक्षणात भाग घेणार आहेत. यंदा एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीसाठी 4 जानेवारीपासून सर्वेक्षण सुरू होईल व यात 4276 शहरी नगरपालिका भाग घेतील.

10 लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये 2019 च्या पहिल्या तिमाहीत जमशेदपूर पहिल्या स्थानावर, नवीन दिल्ली पालिका परिषद क्षेत्र दुसऱ्या आणि खरगौन (मध्यप्रदेश) तिसऱ्या स्थानावर होते. तर दुसऱ्या तिमाहीत जमशेदपूर आणि खरगौन यांनी आपले स्थान कायम ठेवले आणि महाराष्ट्रातील चंद्रूपर दुसऱ्या स्थानावर राहिले.

Leave a Comment