अखेर हार्दिक पांड्याने दिली प्रेमाची कबुली!


क्रिकेट जगतापासून दुखापतीमुळे मागील अनेक दिवसांपासून दूर असलेला भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या आपल्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री आणि सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबतचा एक फोटो हार्दिक पांड्याने इस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. नताशासोबत हातात हात धरून फोटो शेअर केलेला हा फोटो पाहून त्यांनी आपल्या नात्याची पुष्टी केली असेच म्हणावे लागेल. हा फोटो शेअर करत हार्दिकने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या.

View this post on Instagram

Starting the year with my firework ❣️

A post shared by Hardik Pandya (@hardikpandya93) on


हार्दिक पांड्याने फोटो शेअर करताना करत कॅप्शनमध्ये, नवीन वर्षाची माझ्या फायरवर्कसोबत सुरुवात, असे म्हणत हार्दिकने हृदयाची इमोजीही टाकली आहे. युजवेंद्र चहल, अर्जुन कपूर, पंखुरी शर्मा, सिद्धेश लाड, पूर्णा पटेल, सोफी चौधरी, क्रिस्टल डिसूझा यांनी हार्दिकच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहे. हार्दिक आणि नताशाचे नाते या फोटोनंतर अधिकृत मानले जात आहे. हार्दिक आणि नताशाविषयीच्या बातम्यांना ऑगस्ट 2019 पासून ऊत आला आहे. बर्‍याचदा दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार हार्दिकने दोन दिवसांपूर्वी नताशाला आपल्या कुटुंबाशी ओळख करुन दिली आहे.

नताशासाठी हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर मते देखील मागितली होती. छोट्या पडद्यावरील नच बलिये या शोमध्ये नताशाने सहभाग घेतला होता. तसेच नताशाने हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाशी सोशल मीडियावर हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली होती. दोघांनी दुबईमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतल्याचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही डेटिंग करत असल्याची चर्चा होती.

Leave a Comment