अंबानींच्या सुनेच्या मिनी पर्सची किंमत ऐकून तुमचे डोळे चक्रावतील!


आपल्या देशात अथवा परदेशात म्हणा सेलिब्रेटी आणि उद्योगपतींना उच्च राहणीमान, लक्झरी लाईफस्टाइल आणि महागड्या वस्तूांची विशेष आवड असल्यामुळे ते त्यांच्या या साऱ्याच गोष्टी कायम चर्चेत असतात. नुकतीच आपल्या लक्झरी लाईफमुळे अलिकडेच अंबानींची सून श्लोका मेहता चर्चेत आली आहे. श्लोका अंबानी नुकतीच एका पार्टीमध्ये सहभागी झाली होती, त्यावेळी तिच्या हातात असलेल्या मिनी पर्सने साऱ्यांचे लक्ष वेधले होते. हटके अशी तिच्या मिनी पर्सची डिझाइन असून याची किंमत देखील थक्क करणारी होती. खासकरुन तिने घातलेल्या ड्रेसपेक्षाही या पर्सची किंमत अव्वाक करणारी आहे.

श्लोका अंबानी काही दिवसापूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. ती यावेळी प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसत होती. काळ्या रंगाचे कपडे तिने परिधान केले होते. प्रसिद्ध डिझायनर elie saab यांनी तिचा हा ड्रेस डिझाइन केला होता. पण तरीदेखील या सगळ्यामध्ये तिच्या बूमबॉक्स शेप्ड हॅण्डबॅगने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.


अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन डिझायन Judith Leiber यांनी श्लोकाची ही मिनी पर्स डिझाइन केली असून जवळपास ४० लाख ५० हजार रुपयांची या पर्सची किंमत असल्याचे सांगण्यात येते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची श्लोका ही सून आहे. आकाश अंबानीसोबत तिने लग्न केले.प्रसिद्ध हिरेव्यापारी रसेल मेहता यांची श्लोका ही धाकटी मुलगी आहे.

Leave a Comment