रोल्सरॉईसचे वेगवान इलेक्ट्रिक विमान सादर


लग्झरी कारमेकर कंपनी रोल्सरॉईसने जगातील सर्वाधिक वेगवान इलेक्ट्रिक विमान इंग्लंडच्या ग्लुस्टरशायर एअरपोर्टवर नुकतेच सादर केले. हे विमान झिरो एमिशन म्हणजे प्रदूषण मुक्त आणि सिंगल पॅसेंजर विमान असून त्याचा वेग ताशी ४८० किमी आहे. हे विमान २०२० मध्ये अधिकृतरित्या लाँच केले जाणार आहे.

कंपनीच्या अॅक्सीलरेटिंग द इलेक्ट्रिफिकेशन ऑफ फ्लाईट मोहिमेत यशस्वी होण्याच्या रणनीतीचा हा एक भाग आहे. या विमानासाठी सर्वात पॉवरफुल बॅटरी पॅकचा वापर केला गेला असून सिंगल चार्जिंगवर हे विमान लंडन ते पॅरीस हा ४७० किमीचा प्रवास पूर्ण करेल. त्यासाठी वजनाला हलक्या पण पॉवरफुल अश्या ६ हजार सेल्सचा वापर केला गेला आहे.

बॅटरी कुलिंग साठी अॅडव्हान्स्ड कुलिंग सिस्टीम लावली गेली असून विमानाचे प्रोफेलर ३ हाय पॉवर इलेक्ट्रिक मोटर्सवर चालणार आहेत. विमानाच्या मोटर्स सलग ५०० हॉर्स पॉवरची ताकद निर्माण करू शकतात असे सांगितले गेले आहे.

Leave a Comment