याकूब मेननच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता ठाकरे सरकारचा मंत्री


मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारचा समाचार घेताना 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपी याकूब मेमन याच्या फाशीला विरोध करणारा ‘देशद्रोही’ आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ‘देशभक्त’ मंत्री झाला असल्याचे म्हटले आहे.


ट्विटरवर व्हिडीओ शेअर करुन किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. ‘उद्धवा, अजब तुझे सरकार!!!? देशद्रोही आत्ता देशभक्त झाले!!! देशद्रोही अस्लम शेख, आत्ता देशभक्त झाले!!!???’ असे सोमय्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी 2015 मधील अधिवेशनात दहशतवादी याकूब मेमनच्या फाशीची शिक्षा माफ करावी, अशी मागणी केली होती. भाजप, शिवसेना आमदारांनी त्यानंतर विरोध करत सहा वेळा अधिवेशनाचे कामकाज स्थगित केले होते. 2015 मध्ये शिवसेनेने अस्लम शेख यांना ‘देशद्रोही’ म्हटले होते, पण आता तेच ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री झाल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे.

Leave a Comment