विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या प्रियंका गांधींचे पोलिसांनी फाडले चालान


लखनौ – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधातील आंदोलना दरम्यान अटक झालेल्या निवृत्त पोलीस अधीक्षकाच्या कुटुंबीयाची भेट घेतली. यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांनी स्कुटीवरून विनाहेल्मेट प्रवास केल्यामुळे स्कुटी चालकाला 6 हजार 100 रुपयांचा दंड ठोठावला आहे.

निवृत्त पोलीस निरीक्षक एस.आर. दारापुरी यांना कायद्याविरोधातील आंदोलनात हिंसा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रियंका गांधी दारपुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात होत्या. प्रियंका गांधी यांच्या गाडीने यावेळी अचानक वाहतूक मार्गात बदल केल्यामुळे त्यांना पोलिसांनी रोखले. प्रियंका गांधी वादविवादानंतर काँग्रेस कार्यकर्ता धीरज गुर्जर यांच्या स्कुटीवर बसून दारापूरी यांच्या घरी गेल्या. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यावेळी हेल्मेट न घातल्यामुळे धीरज गुर्जर 6 हजार 100 रुपयांचे चालान फाडले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 2 हजार 500 रुपये, विनाहेल्मेट प्रवासासाठी 500 रुपये, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे 300 रुपये, खराब नंबर प्लेटसाठी 300 रुपये आणि चुकीच्या पद्धतीने गाडी चालवल्यामुळे 2 हजार 500 रुपये, असा दंड ठोठावला आहे.

Leave a Comment