नौदल जवानांच्या फेसबुक वापरावर गदा

Image Credited – Deccan Herald

भारतीय नौदलाने आपल्या जवानांना सोशल मीडिया साइट फेसबूक वापरण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय नौदलाचे तळ, डॉक यार्ड आणि युद्धनौकांवर स्मार्टफोन वापरण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शत्रू राष्ट्राच्या गुप्तचर संस्थाना संवेदनशील सुचना लीक करताना 7 नौदलाच्या जवानांना अटक केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

भारतीय नौदलाने फेसबुकच्या वापरावर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. फेसबुकवर प्रतिबंध घालण्याबरोबरच नौदलाच्या क्षेत्राच्या सर्व ठिकाणांवर स्मार्टफोन देखील वापरता येणार नाही. फेसबुकवर बंदी घातल्यानंतर कंपनीच्या मालकीचे व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम अॅपवर देखील बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलात एकूण 67252 जवान आहेत. या बंदीची सर्वात मोठी समस्या जे असैनिक कर्मचारी आणि नौसैनिक डॉकयार्डमध्ये काम करतात त्यांची असेल, कारण ते नौदलाच्या नियमांतर्गत येत नाहीत.

Leave a Comment