सारा अली खानने शेअर केले Bikini Photos


कुटुंबासोबत ख्रिसमस साजरा केल्यानंतर अभिनेत्री सारा अली खान आता पुन्हा तिच्या मैत्रिणीसोबत ख्रिसमस व्हेकेशनसाठी रवाना झाली. त्यानंतर सोशल मीडियावर तिने आपले काही बिकिनी फोटो शेअर केले आहेत.

View this post on Instagram

Start your day with a splash 💦 ☀️ 🌊

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


सारा तिच्या मैत्रिणीसोबत या फोटोंमध्ये पूलमध्ये एंजॉय करताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचे हे फोटो खूप व्हायरल होत आहेत.


सध्या तिची मैत्रिण काम्या अरोरासोबत सारा व्हेकेशनवर आहे. पण या दोघी कुठे गेल्या आहेत याची माहित नाही. पण साराचा बिकिनी लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

View this post on Instagram

☀️🦋🌊🛶⛵️🚤🏝

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on


सारा या फोटोमध्ये समुद्राला समांतर असलेल्या पूलमध्ये चिल करताना दिसत आहे. त्याच्या बाजूला एक हाऊस बोट आहे. त्यावरून हे लोकेशन केरळमधील असल्याची चर्चा आहे.


याआधी भाऊ इब्राहिम आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत साराने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले होते. सोशल मीडियावर तिचा हा ख्रिसमस लुक खूप व्हायरल झाला होता.


इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ या चित्रपटातून सारा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती पहिल्यांदाच या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

Leave a Comment