बीएस6 इंजिनसह लाँच झाली कावासाकीची ‘झेड900’ बाईक

Image Credited – CarandBike

भारतीय कावासाकी मोटर्सने आपली पहिली बीएस 6 मानकांसह झेड900 ही बाईक लाँच केली आहे. 2020 कावासाकी झेड900 ची किंमत 8.50 लाख रुपये ते 9 लाखांच्या मध्ये आहे. बीएस4 मॉडेलची किंमत 7.69 लाख रुपये होती.

Image Credited – MotorBeam

नवीन मॉडेलच्या व्ह्यूजवल बदल करण्यात आलेले नाहीत. आधीच्या मॉडेलप्रमाणेच नवीन मॉडेल आहे. नवीन मॉडेलमध्ये स्पोर्ट्स, रेन, रोड आणि मॅन्युअल असे चार रायडिंग मोड्स देण्यात आलेले आहेत. बाईकमध्ये 10.9 सीसी टीएफटी इंस्ट्रुमेंट कंसोल एक नवीन फीचरसोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि कावासाकी रीडियोलॉजी अप मिळेल. झेड900 ला एका एलईडी हेडलँम्पसह अपग्रेड करण्यात आलेले आहे. याला हॅलोजन यूनिटने बदलण्यात आले आहे.

Image Credited – MotorcycleDiaries

इंजिनबद्दल सांगायचे तर यात कावासाकी झेड900 मध्ये बीएस6 948सीसी इन-लाईन फोर सिलेंडर मोटर मिळेल. जे 9500 आरपीएमवर 123 बीएचपी पॉवर आणि 7700 आरपीएम वर 98.6 एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्ससह एक स्लिप आणि असिस्ट क्लचने सुसज्ज आहे. बाईकमध्ये सस्पेंशन आणि ब्रेकिंग टेक्नोलॉजी मिळेल.

याशिवाय बाईकमध्ये राइडसाठी स्पोर्टमॅक्स रोडस्पोर्ट 2 टायर्स देण्यात आले आहेत. नवीन झेड900 बाईक मेटालिक ग्रेफाइट ग्रे/मेटालिक स्पार्क ब्लॅक आणि मेटालिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक या दोन रंगात उपलब्ध आहे.

Leave a Comment