जीएसटी रिटर्न्स न भरल्यास संपत्ती, बँक खात्यावर जप्ती

Image Credited – Hindustan

वारंवार सुचना देऊन देखील जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांना आता कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. जीएसटी रिटर्न्स न भरणाऱ्यांची संपत्ती आणि बँक खाते जप्त केले जाऊ शकते. तब्बल 1 कोटींपेक्षा अधिक जण जीएसटी रिटर्न वेळेवर भरत नाही. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला जीएसटीआर-3ए अर्थात फायनल जीएसटी रिटर्न भरले जाते. त्याआधी 3 दिवस ही प्रक्रिया सुरू केली जाईल. देय तारखेनंतर रिटर्न्स न भरणाऱ्यांना एक मेसेज पाठवला जाईल.

देय तारखेनंतर 5 दिवसांनी इलेक्ट्रॉनिक नोटीस पाठवली जाईल. ज्यात रिटर्न्स भरण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली जाईल. त्यानंतर देखील काहीही प्रतिक्रिया न आल्यास अधिकारी त्या व्यावसायिकाची टॅक्स लायबिलिटी तपासेल. जर 30 दिवसांच्या आत देखील कोणतेही उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करतील.

 

Leave a Comment