Video : आंदोलनावेळी या 5 ठिकाणी पोलिसांनी आपल्या कृत्याने जिंकले मन

(Source)

देशातील अनेक राज्यांमध्ये नागरिकत्व कायदा (सीएए) आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन (एनआरसी) वरून जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे. नागरिक सरकारला कायदा मागे घेण्यास सांगत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश भागात अनेक ठिकाणी पोलिसांच्या वागणुकीमुळे लोक नाराज आहेत. मात्र काही ठिकाणांवरील पोलिसांचे असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्याने सर्वांचेच मन जिंकले आहे. याबद्दल जाणून घेऊया.

हा व्हिडीओ मुंबईचा असून, यामध्ये आयपीएस मनोज शर्मा दिसत आहेत. ते आंदोलन करणाऱ्यांना आवाहन करत आहेत की, पोलीस आंदोलन करणाऱ्यांना सहकार्य करत आहेत. आपले मत मांडा, मात्र शांतपुर्ण पद्धतीने. मनोज कुमार सांगत आहेत की, पोलिसांचा कोणताही धर्म नाही. ते मुस्लिम ही नाहीत की हिंदू देखील नाहीत.

हा व्हिडीओ बंगळुरूचा असून, लोक परवानगी नसताना देखील टाउनहॉलच्या बाहेर प्रदर्शन करत होते. पोलिस आंदोलनकर्त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र ते तयार होते. तेव्हाच बंगळुरू सेंट्रलचे डीसीपी चेतन सिंह राठौड यांनी तेथील लोकांसोबत राष्ट्रगीत सुरू केले. राष्ट्रगीतानंतर सर्वांनी जागा खाली केली.

हा व्हिडीओ देखील बंगळुरूचा असून, एक महिला मुस्लिमांच्या हक्कांसाठी विद्यार्थ्यांच्या दलाचे नेतृत्व करत होती. तेव्हा तेथे इंस्पेक्टर तनवीर अहमद येतात व महिलेला जायला सांगतात. ते त्या महिलेला सांगत आहेत की, माझे नाव तनवीर अहमद आहे, मी पोलीस स्टेशनचा अधिकारी आहे. तुम्ही तुमच्या विरोध प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना उकसवत आहात आणि कारवाई त्यांना सहन करावी लागत आहे.

हा व्हिडीओ अलिगढचा आहे. अलिगढ मुस्लिम युनिवर्सिटीमध्ये जवळपास 5000 विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. पोलीस देखील तयारीत होते. विद्यार्थ्यांना युनिवर्सिटीच्या गेटवरच थांबवण्यात आले. यावेळी एसएसपी आकाश कुलहरि तेथे पोहचले व विद्यार्थ्यांना समजवले.

हा पाचवा व्हिडीओ इटावाचा (उत्तर प्रदेश) असून, येथे एसएसपी संतोष मिश्रा एका मुलाला नागरिकत्व कायद्याच्या परिणामांबद्दल सांगत आहेत.

Leave a Comment