विमान प्रवास दरम्यान सहप्रवाशाने प्रज्ञा ठाकुर यांना सुनावले; व्हिडिओ व्हायरल


भोपाळ- शनिवारी संध्याकाळी दिल्लीवरुन स्पाइसजेटच्या विमानाने भोपाळला येत असताना भाजप खासदार प्रज्ञा ठाकुर आवडीची जागा न मिळाल्यामुळे नाराज झाल्या. यावेळी एका सहप्रवाशासोबत त्यांचा वादही झाला. सध्या सोशल मीडियावर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, प्रज्ञा यांना सहप्रवासी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे.


शनिवारी संध्याकाळी स्पाइसजेटच्या विमानाने प्रज्ञा दिल्लीवरुन भोपाळला येत होत्या. सीट नंबर ए-2 त्यांना देण्यात आली होती, पण प्रोटोकॉल म्हणून सीट नंबर ए-1 हवी होती. पण दुसऱ्या एका प्रवाशाला ही सीट देण्यात आली होती. भोपाळच्या राजाभोज एअरपोर्टवर संध्याकाळी 7 वाजता विमान लँड झाले. येथे सर्व प्रवासी उतरले, पण प्रज्ञा उतरल्या नाहीत. त्यांना स्पाइसजेटच्या क्रुने बाहेर येण्यास सांगितले पण त्या आल्या नाहीत. थोड्यावेळानंतर एयरपोर्ट डायरेक्टर अनिल विक्रम विमानतळावर आल्याचे कळताच त्या विमानातून उतरल्या. त्यांच्या या कृत्यामुळे विमानाला परत दिल्लीला पोहचण्यास 20 मिनीटांचा उशीर झाला.

Leave a Comment