संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना पुणे जिल्ह्यात नो एंट्री


पुणे- 1 जानेवारीला कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमादिवशी शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना 4 दिवस पुणे जिल्ह्यात येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. त्याचबरोबर सर्व राजकीय आणि सामाजिक संघटनांना या दिवशी सदर ठिकाणी सभा घेण्यास परवानगी देण्याचे ठरवण्यात आले.

मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिंडेंसह 163 जणांना जिल्हाबंदी घालण्यात आली आहे. 2018 साली कोरेगाव भीमामध्ये उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्या सर्वांवर जिल्हाबंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने काल जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भिडे आणि एकबोटे यांना जिल्हाबंदी करण्याचा निर्णय झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

Leave a Comment