2019 मध्ये या 9 स्टार किड्सचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

(Source)

2019 हे वर्ष बॉलिवूडसाठी खास होते. या वर्षी अनेक स्टार किड्सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यातील काही स्टार किड्सनी लोकांच्या मनात जागा केली तर काही आपली छाप सोडण्यास अपयशी ठरले. या अशाच स्टार किड्सविषयी जाणून घेऊया.

(Source)

अनन्या पांडे –

या यादीत सर्वात प्रथम नाव चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेचे आहे. अनन्याने करण जोहरचा चित्रपट ‘स्टुडेंट ऑफ द इअर 2’ द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती कार्तिक आर्यन आणि भूमीसोबत ‘पति, पत्नी और वो’ मध्ये देखील दिसली. अनन्याची खूप कमी वेळातच मोठी फॅन फॉलोविंग झाली आहे.

सई मांजरेकर –

महेश मांजरेकर यांची मुलगी सईने सलमान खानसोबत ‘दंबग-3’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. चित्रपटाआधीच इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोवर्स होते.

शार्मिन सेहगल –

शार्मिन सेहगल प्रसिद्ध डायरेक्टर आणि प्रोड्यूसर संजय लिला भंसाळी यांची भाची आहे. तिने यावर्षी ‘मलाल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

करण देओल –

करण, सनी देओलचा मुलगा आहे. त्याने यावर्षी ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट स्वतः सनी देओलने दिग्दर्शित केला होता.

View this post on Instagram

#Repost @blankthefilm with @make_repost ・・・ A live bomb – all set and rigged to blow at the perfect time! Stay tuned for #BlankMovie and watch the mystery unfurl in cinemas on 3rd May. @behzu @iamsunnydeol @karankapadiaofficial @karanvirsharma @ishidutta @jameel.mumbai #EchelonProductions @carnivalpicturesindia @EaseMyTrip #DrShrikantBhasi @nishantpitti #TonyDsouza @itsvishalrana @panorama_studios @andpicturesin #blank #blankthefilm #bollywood #upcomingmovie #sunnydeol #sunnydeolstyle #karankapadia #ishitadutta #karanvirsharma #trailer #blanktrailer #outnow #warningnahidunga #songoutnow #newsong #newsongalert #carnivalpictures #3rdmay #sunnydeolpaaji #bollywoodmovie #bollywood #movie #films #comingsoon #staytuned

A post shared by Karan Kapadia (@karankapadiaofficial) on

करण कपाडिया –

करण कपाडिया हा अभिनेत्री सिंपल कपाडिया यांचा मुलगा आहे. त्याने यावर्षी ‘ब्लँक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

वर्धन पुरी –

अमरिश पुरी यांचा नातू वर्धनने 2019 मध्ये ‘ये साली आशिकी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.

प्रनूतन बहल –

प्रनूतन बहल ही बॉलिवूड अभिनेता मोनीश बहल यांची मुलगी आहे. तिने यावर्षी ‘नोटबूक’ चित्रपटात काम केले.

मिजान जाफरी –

जावेद जाफरी यांचा मुलगा मिजान जाफरीने देखील यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मिजानने ‘मलाल’ या चित्रपटात शर्मिल सेहगलसोबत प्रमूख भूमिका साकारली आहे.

(Source)

अभिमन्यू दसानी –

अभिमन्यू हा बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री यांचा मुलगा आहे. अभिमन्यूने ‘मर्द को दर्द नहीं होता’ मध्ये मूख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे तो खूपच चर्चेत आला होता.

Leave a Comment