आश्चर्यच ! 1160 वर्षांपुर्वी स्थापन झालेली लायब्रेरी आजही आहे सुरू

(Source)

वाचनालय अर्थात लायब्रेरी हे नाव ऐकले की, काही जणांना त्यांच्या कॉलेजच्या दिवसांची आठवण येईल. तर अनेकजणांनी कधी लायब्रेरीमध्ये पाऊल देखील ठेवलेले नसण्याची शक्यता आहे. काहींसाठी लायब्रेरी ही मजेशीर गोष्ट आहे, तर काहींसाठी ती एक कंटाळवाणी जागा देखील असू शकते. मात्र तुम्हाला 1100 वर्षांपुर्वी सुरू झालेली लायब्रेरी जी आजही चालू आहे, तिच्याबद्दल माहिती आहे का ?

(Source)

मोरक्कोच्या फेज शहरात अल-कारावियन लायब्रेरी आहे. ही लायब्रेरी ईसवी सन 859 मध्ये सुरू करण्यात आली होती. ही लायब्रेरी जगातील सर्वाधिक वर्ष सतत सुरू असलेल्या विश्वविद्यालयाचा भाग आहे. अनेक छोट्या-मोठ्या बदलांसह या लायब्रेरीने 1000 वर्षांचा टप्पा पार केलेला आहे. या लायब्रेरीची स्थापना फातिमा-अल-फिहरी, ट्यूनिशाच्या एका व्यापाऱ्याच्या मुलीने केली होती.

(Source)

रिपोर्टनुसार, 2012 मध्ये कॅनेडियन-मोरोक्कन आर्किटेक्ट अजीजा चाउनीने या लायब्रेरीमध्ये बदल करत पुन्हा याला नवीन स्वरूप दिले.

(Source)

रेस्टोरेशननंतर लायब्रेरी लोकांसाठी पुन्हा सुरू करण्यात आली. याआधी ही लायब्रेरी केवळ अभ्यासकांसाठीच उघडली जात असे. या लायब्रेरीमध्ये जगातील सर्वाधिक जूनी हस्तलिखिते व पुस्तके आहेत.

(Source)

या लायब्रेरीमध्ये जवळपास 4000 मॅन्यूस्क्रिप्टस (हस्तलिखित) आहेत. येथे 9व्या शतकातील कुराण देखील असून, पैगंबर मोहम्मद यांच्या आयुष्यातील काही सर्वात जुने लिखित पुरावे आहेत. हे कुराण आजही त्याच बाइंडिंगमध्ये आहे.

Leave a Comment