या महिलेच्या शरीरात लावण्यात आल्यात 2 चिप, या कामासाठी होतो वापर

(Source)

31 वर्षीय एक महिला इंजिनिअर विंटर म्राजला अमेरिकेत सध्या ‘बायोनिक वुमन’ म्हणून ओळखल्या जात आहेत. या महिलेने एका टिव्ही कार्यक्रमात खुलासा केला की, त्यांच्या हातात दोन चिप इम्प्लांट करण्यात आल्या आहेत. यातील एक चिपचा वापर दरवाजा उघडण्यासाठी व दुसऱ्या चिपचा वापर बिझनेस कार्ड म्हणून केला जात आहे. याशिवाय हातातील बोटांमध्ये चुंबक आणि एका बाजूला दोन प्लॅश लाइट इम्प्लांट केली आहे. जेणेकरून या महिलेला दैनंदिन कामे करण्यास सोपे जाईल.

व्यावसायिक असलेली म्राज सांगते की, सामान्य महिला ते बायोनिक वुमन बनण्याची सुरूवात कार अपघातानंतर सुरू झाली. अपघातात त्यांची मान, गुडघे आणि टाच तुटले होते. यावेळी त्यांच्या अनेक सर्जरी करण्यात आल्या. त्यांचा एक गुडघा कॅप 3डी प्रिंटेड आहे. अनेक वर्षांच्या सर्जरीनंतर काम सोपे करण्यासाठी त्यांनी इम्प्लांट करण्याचा विचार केला.

म्राज यांनी सांगितले की, त्यांच्या डाव्या हातात एक मायक्रोचिप बसवण्यात आली आहे, जी त्यांच्या घराचा दरवाजा उघडण्यास मदत करते. तसेच कामाच्या ठिकाणी सिक्युरिटी कार्ड म्हणून देखील त्याचा वापर होतो. त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना चिप लावण्याचा सल्ला दिला होता.

दुसऱ्या हातातील चिपमध्ये बिझनेस कार्डचे कॉम्प्युटरराईज्ड व्हर्जन स्टोर आहेत. जे त्या लोकांच्या फोनवर पाठवू शकतात. बोटांमध्ये देखील चुंबक इम्प्लांट करण्यात आले आहे. यामुळे त्या वायरला स्पर्श करण्यापासून वाचतात.

Leave a Comment