पहिल्या दिवशीच ‘दबंग ३’ने कमावले २४ कोटी


बॉक्स ऑफिसवर काल सलमान खानचा बहुप्रतिक्षीत ‘दबंग ३’ चित्रपट रिलीज झाला असून, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी २४ कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली असून देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जोरदार निदर्शने सुरू असतानाच पहिल्याच दिवशी २४ कोटींची कमाई करणे यातच ‘दबंग ३’चे यश असल्याचे म्हटले जात आहे.

हा चित्रपट पहिल्या दिवशी २२ ते २४ कोटी रुपयांची कमाई करेल, अशी शक्यता boxofficeindia.com यांनी वर्तवली होती. एका अन्य अहवालानुसार, या चित्रपटाला १५ ते २० टक्क्यांचे देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांमुळे नुकसान झाले आहे. हा चित्रपट पहिल्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत २५ कोटींचा आकडा पार करेल, असा दावा केला जात होता. पण तो दावा फेल ठरला आहे. काही ठिकाणी चित्रपटगृहे लवकर बंद करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे चित्रपटाची कमाई नसल्याचे काही अहवालातून सांगण्यात आले आहे.

तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांतूनही ‘दबंग ३’ चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. मात्र, यातून चित्रपटाला फारशी चांगली कमाई झालेली नाही. अन्य भाषा आणि मुख्य हिंदी भाषेतील मिळून या चित्रपटाची एकूण कमाई २५ कोटींचा आकडा पार करू शकलेली नाही.

Leave a Comment