आयपीएल लिलावात कोट्यावधींची बोली लावणारी कोण आहे ‘ही’ मिस्ट्री गर्ल !


गुरुवारी कोलकाता येथे आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव कार्यक्रम पार पडला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे या लिलावात वर्चस्व राहिले. यामध्ये ऑस्ट्रेलियन संघातील सहकारी ग्लेन मॅक्सवेल आणि नेथन कुल्टर-नाईल यांच्यावरही संघांनी मोठी बोली लावली. १०.७५ कोटींच्या बोलीसह किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाने ग्लेन मॅक्सवेलला आपल्या संघात सामील करुन घेण्यात यश मिळवले. किंग्ज इलेव्हन पंजाबने या आयपीएल लिलावामध्ये सर्वाधिक ४२.७० कोटींचा रुपयांची बोली लावून सहभागी झाले. आयपीएलमध्ये अनेक वर्षांपासून मिस्ट्री गर्ल्सची चर्चा असते. २०१८ मधील मालती चहर असो या आरसीबी चाहती दीपिका घोष असो. यंदाच्या वर्षी देखील एका मिस्ट्री गर्ल चर्चेत आली आहे.

सनरायझर्स हैदराबादचे मार्गदर्शन व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन आणि प्रशिक्षक ट्रेवर बेलिस यांच्यासोबत गुरुवारी आयपीएल २०१९च्या लिलावादरम्यान ही चर्चेत असलेली मिस्ट्री गर्ल दिसली. सतत लिलावादरम्यान ती दिसली. एसआरएचला जवळपास एक तास पहिली खरेदी करण्यासाठी लागला. पण या मिस्ट्री गर्लमुळे तोपर्यंत सोशल मीडियावर खळबळ झाली होती.

एसआरएच संघाचे मालक कलानिथ मारन यांची २७ वर्षांची काव्या मारन ही मुलगी आहे. ती फ्रँचायझीची सहकारी मालक आहे. काव्या एक क्रिकेट प्रेमी आहे. सध्या सन टीव्ही आणि सन टीव्हीच्या एफएम वाहिन्यांचे ती काम पाहते. सर्वप्रथम आयपीएल २०१८ दरम्यान काव्या दिसली होती. ती यावेळेस कोप्पलच्या राजीव गांधी स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरूद्धच्या सामन्यादरम्यान हैदराबादचे समर्थन करताना दिसली होती. चेन्नई येथून काव्याचे एमबीए झाले आहे. सध्या तिचे संपूर्ण लक्ष आयपीएलवर आहे.

Leave a Comment