आता चहा देखील होणार कडू !


मुंबई : देशात कांद्याच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर टोमॅटोच्या किंमती देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता सर्वांची आवडती चहाच्या किंमतीत देखील वाढ होणार आहे. मुंबईसह महानगर क्षेत्रामधील तब्बल पाच हजार चहा विक्रेत्यांची चहा आणि कॉफी असोशिएशन नावाच्या या संघटनेने चहाची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. चहा विक्रेत्यांना किंमती वाढवण्यास असोशिएशनने सांगितले आहे.

मुंबई महानगर क्षेत्रात चहाविक्री करणाऱ्या पाच हजार विक्रेत्यांना चहा आणि कॉफी असोशिएशनने चहाची किंमत एक ते दोन रुपयांनी वाढण्यास सांगितले आहे. टीसीएने सांगितले की, दूध, साखर, चहापूड, एलपीजी सिलेंडरच्या किंमती खूप वाढलेल्या असल्यामुळे चहाची किंमत वाढवणे गरजेचे झाले आहे. चार वर्षांपूर्वी टीसीएची निर्मिती झाली असून चहाविक्रेत्यांना टीसीएकडून व्यवसायाबाबतचे आणि स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. चहाविक्रेत्यांना टीसीएने नव्या किंमती लवकर सुरु करण्यास सांगितले आहे.

दरम्यान आता केवळ टपरीवरच चहा विकला जात नाही. कॉफीप्रमाणे चहाचेही अनेक मोठ-मोठे आऊटलेट्स सर्वत्र उपलब्ध आहे. येवले चहा, अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, रावजी चहा, अभिनंदन चहा, शेठजी चहा, चाय टाईम, Tea पी सारख्या आऊटलेट्समध्ये 10 रुपयांपेक्षा कमी किंमती चहा उपलब्ध नाही. 10-15 रुपयांपेक्षा जास्त किंमतीत या चहाच्या दुकानांमध्ये चहा विकला जातो. त्यामुळे टपऱ्यांवरील चहाच्या किंमती वाढल्याने काहीही परिणाम होणार नसल्याचा अंदाज चहा विक्रेते व्यक्त करत आहेत.

Leave a Comment