‘छपाक’मधील पहिले वहिले गाणे रिलीज


काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपट अ‌ॅसिड हल्ल्यातून बचावलेली पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या जीवनावर आधारित असून आता ट्रेलरनंतर या चित्रपटातील पहिले वहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. अव्यक्त प्रेमाची झलक या गाण्यातून उलगडली आहे.

या चित्रपटात दीपिकासोबत अभिनेता विक्रांत मेस्सीने भूमिका साकारली आहे. दोघांचीही रोमॅन्टिक केमेस्ट्री ‘नोक झोक’ या गाण्यात पाहायला मिळते. या गाण्याचा व्हिडिओ दीपिकाने सोशल मीडियावर शेअर करत तिने या व्हिडिओला ‘बिगडी हुई बात को बनाता है और रूठे हुये प्यार को मनाता है प्यार’, असे कॅप्शन दिले आहे.


हे गाणे सिद्धार्थ महादेवनने गायले आहे. तर, हे गाणे शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केले असून या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केले आहे. यापूर्वी त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला ‘राजी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता ‘छपाक’ मधून लक्ष्मी अग्रवालची कथा पडद्यावर मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. हा चित्रपट १० जानेवारीला रिलीज होणार आहे.

Leave a Comment