बिल गेट्स, बेझॉस नाही तर ही आहे इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

(Source)

जॅकब फग्गर हा व्यक्ती जर आज जिंवत असता तर बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, वॅरेन बफेट आणि कारलोस स्लिम या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपेक्षाही अधिक मोठा अब्जाधीश असता. जॅकबचे चरित्रकार आणि वॉल स्ट्रीट जनरलचे माजी संपादक ग्रेग स्टाइनमेट्ज यांच्यानुसार, या जर्मन बॅक आणि उद्योगपतीला ‘द रिच वन’ म्हटले जात असे. 1459 ते 1525 या काळात जॅकबने आजचे 400 बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 25 खर्व रुपये कमवले होते. 2015 मध्ये जॅकबला आपल्या पुस्तक ‘द रिचेस्ट मॅन हू एव्हर लिव्हड’ मध्ये इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटले आहे.

(Source)

ग्रेग सांगतात की, निसंशयरित्या जॅकब आतापर्यंतचा सर्वात ताकदवर बँकर होता. तो त्याकाळात रोमन साम्राज्य आणि पोप यांना पैशांचा पुरवठा करत असे. इतिहासात अशी एकही व्यक्ती नव्हती जिच्याकडे एवढी राजकीय ताकद असेल. फग्गरने ठरवले होते की, स्पेनचा राजा चार्ल्स-1 ला रोमचा राजा बनवायचे होते व चार्ल्स-5 च्या रुपात त्याला यश देखील आले.

(Source)

त्या काळातील अब्जाधीश मेडिकी, सीझर आणि लुसरेजिया बोर्गिया बंधुंविषयी अनेकांना माहिती आहे. मात्र फग्गरविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. याविषयी ग्रेग सांगतात की, असे यामुळे होते की कारण फग्गर जर्मन होते व इंग्रजी बोलणाऱ्या जगात त्यांची ओळख झाली नाही.

(Source)

त्या काळातील अब्जाधीश जसे पैसे उडवायचे, अय्याशी करायचे तसा फग्गर नव्हता. त्याने कधीच राजकीय ऑफिस बनवले नाही की इमारती बांधल्या नाहीत. त्याने केवळ दक्षिण जर्मनीच्या ऑग्सबर्गमध्ये एक सामाजिक हाउसिंग सोसायटी बांधली. येथे राहणारे लोक आजही वर्षाला 1 डॉलर एवढे भाडे देतात.

(Source)

ग्रेग सांगतात की, बँकर त्याकाळी लपून काम करत असे. फग्गरने आपल्या कर्जाच्या बदल्यात तांबे-चांदीच्या व्यापारात एकाधिकार मिळवला. याशिवाय त्याने मसाल्यांचा व्यापार केला. तो भांडवलशाहीचा पुरस्कर्ता होता.

(Source)

फग्गरने दुसऱ्या शहरातून व्यापारी आणि राजकीय माहिती घेऊन येणाऱ्याला पैसे देण्यास सुरूवात केली. फग्गरनंतरच्या लोकांनी देखील ही परंपरा सुरूच ठेवली व फग्गर न्यूजलेटर्सची सुरूवात केली. इतिहासातील सुरूवातीच्या वृत्तपत्रापैकी हे एक समजले जाते.

त्यावेळी कर्जावर व्याज घेणे चर्च चुकीचे मानत असे. अशावेळी फग्गरने पोप लियो-5 शी संपर्क साधला. ऑग्सबर्कच्या बँकेत पैसे जमा करणाऱ्याला 5 टक्के व्याज देण्याची देखील त्याने घोषणा केली होती.

Leave a Comment