उपाशी व्यक्तीसोबत जेवतानाचा पोलिसाचा व्हिडीओ व्हायरल

(Source)

केरळ पोलीस दलातील अधिकारी एसएस श्रीजीत यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे एका रात्रीत ते हिरो झाले आहेत.

30 वर्षीय पोलीस अधिकारी श्रीजीत यांचा संपाच्या दिवशी एका व्यक्तीसोबत वाटून जेवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सोमवारी तिरुअनंतपुरम येथे संप होता, हा व्हिडीओ त्याच दिवशीचा आहे.

കേരള പോലീസ് എന്നും ജനങ്ങളോടൊപ്പം

കേരള പോലീസ് എന്നും ജനങ്ങളോടൊപ്പം#ജനങ്ങളോടൊപ്പം#keralapolice#statepolicemediacentre

Posted by State Police Media Centre Kerala on Tuesday, December 17, 2019

हा व्हिडीओ फेसबूक पेज स्टेट पोलीस मीडिय सेंटर केरळ या वर शेअर करण्यात आलेला आहे. हा व्हिडीओ शूट करणारा पोलिसाचाच एक मित्र आहे.

राज्याचे पोलीस डायरेक्टर जनरल लोकनाथ बेहरा यांनी पोलीस अधिकाऱ्याला बोलवून त्यांचे कौतूक देखील केले. एसएस श्रीजीत यांनी सांगितले की, माझे जेवण उघडताच मी पाहिले की, एक व्यक्ती माझ्याकडे पाहत आहे. मला समजले की तो उपाशी आहे. मी त्याला विचारल्यावर त्याने देखील उपाशी असल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्याला माझ्यासोबतच जेण्यास सांगितले. सुरूवातीला त्या व्यक्तीने नकार दिला, मात्र नंतर जोर दिल्यावर तो तयार झाला.

 

Leave a Comment