थंडीत वजन कमी करण्यासाठी या 5 गोष्टींचा करा आहारात समावेश

(Source)

हिवाळ्यात अनेक लोकांचे वजन वाढते. कारण हिवाळ्या पाचनक्रिया जलद होत असते. यावेळी डायजेशन सिस्टम योग्यरित्या काम करत असल्याने भूक लागते. मात्र आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास तुम्ही वजन नियंत्रणात ठेऊ शकता.

(Source)

गाजर –

गाजरात मोठ्या प्रमाणात फायबर असते. हेच तुमच्या डायजेशन सिस्टमवर ब्रेक लावण्यास फायदेशीर ठरते. गाजरात कॅलेरी खूप कमी असतात व ते खाल्याने पोट देखील लगेच भरते.

(Source)

बीट –

बीटमध्ये देखील वजन कमी करणारे फायबर असते. 100 ग्रॅम बीटात केवळ 43 ग्रॅम कॅलेरी, 0.2 ग्रॅम फॅट आणि 10 ग्रॅम कार्बोहायड्रेड असते. याचे सलाड अथवा ज्यूसचे सेवन केल्याने भूक कमी लागते.

(Source)

दालचिनी –

एका रिपोर्टनुसार, दालचिनीचे नियमित सेवन केल्याने वजन नियत्रंणात राहण्यास मदत होते.

(Source)

मेथीचे दाने –

मधुमेह आणि इंसुलिन नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथीचे दाणे खूपच फायदेशीर असतात. हे शरीराच्या मेटाबॉलिज्म सिस्टमला व्यस्थित ठेवण्यासाठी देखील मदत करते. यामध्ये असणारे वॉटर सॉल्यूबल कॉम्पोनेंट खाण्याची इच्छा कमी करते.

(Source)

पेरू –

थंडीत मिळणारा पेरू फायबरची गरज 12 टक्क्यांनी भागवते. दररोजच्या डाइटमध्ये याचा समावेश केल्यास तुम्ही वेगाने एक किलो वजन देखील कमी करू शकता.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment